निरपेक्ष प्रेम म्हणजे काय? निरपेक्ष प्रेम हि केवळ एक संकल्पना आहे का? दोन व्यक्तींनी एकमेकांवर प्रेम करताना त्यांनी एकमेकांकडून काहीच अपेक्षा केल्या नसतील का? एखाद्याला पाहताच क्षणी वाटते तेच केवळ निरपेक्ष प्रेम.... त्या पुढचा प्रवास म्हणजे केवळ अपेक्षांचा खेळ. प्रेमाला अपेक्षांनी केलेला व्यावहारिक स्पर्श. एखादा भक्त सुधा देवाची मनोभावे पूजा करती ती तरी कुठे निरपेक्ष असते? मग निरपेक्ष प्रेम म्हणजे काय? कुठे बघयला मिळेल ते? आहे एखादे उदाहरण तुमच्या माहितीत?
गुरुवार, २८ ऑक्टोबर, २०१०
मंगळवार, ५ ऑक्टोबर, २०१०
Prashna
काही माणसे आपल्या आयुष्यात एक प्रश्नचिन्ह बनून येतात आणि शेवट पर्यंत प्रश्नचिन्ह म्हणूनच राहतात. त्यांच्या बाबतीतले सगळेच प्रश्न कायम अनुत्तरीत राहतात. Every question has an answer हे कितपत खरे आहे ?
Ekant
एकांत म्हणजे एकटेपणा.. पण हा आपल्याला माहित असलेला अर्थ झाला..एकांत ह्या शब्दाची फोड केली तर एक + अंत म्हणजे एकतेणापाचा अंत असं नाही का होणार? किंवा मग एक + अंत म्हणजे जेव्हा एकाचा अंत होतो म्हणजेच तेव्हा मी आणि myself असतो असा अर्थ असेल? एकांत म्हणजे एकटेपणा नाही.. एकांत म्हणजे आपल्याला आपल्याशी बोलायला मिळालेला निवांत वेळ.. आणि बोलणे हे नेहमी २ जणांमध्ये होते मग आपण आपल्याशी बोलताना एकटे कसे असणार?
ganapati bappa
येताना वाटेल दिसलेले सार्वजनिक गणपती मंडप पाहून एकदम शाळेतले दिवस आठवले. आंतरवर्गीय अथर्वशीर्ष स्पर्धा, त्या निमित्ताने ऑफ तास मागून केलेल्या तालमी...एक वेगळीच मजा होती. संध्याकाळी शाळेतून घरी येताना वाटेत लागणारा बटन फक्टारीचा गणपती. गणपतीच्या निमित्ताने केलेली खास सजावट आणि शेंगदाणे फुटण्याचा प्रसाद हेच मुख्य आकर्षण होते. रोज रोज तोच गणपती, तोच देखावा आणि तेच फुटाणे खाण्यात पण एक अप्रूप होते. किती मस्त आणि निरागस दिवस होते ते..
Ayushya
आयुष्य हे कधीच कुणासाठी थांबत नसते. ते सतत आपल्या गतीने धावत असते. आपण मात्र जन्मभर हा वेग साधायचा प्रयत्न करत राहतो. ज्या क्षणी आपल्याला वाटते कि आपल्या नसण्याने एखाद्या व्यक्तीचे आयुष्य थांबेल.. त्याच क्षणी आपले आणि आयुष्यामाध्ले अंतर वाढायला लागते. एखाद्याचे आपल्या आयुष्यात असणे किंवा नसणे हे पण आपल्या मान्यतेवर अवलंबून आहे. सगळाच आपल्या सवयीचा भाग. एखाद्याच्या असण्याची जशी सवय होते तशीच नसण्याची पण करून घ्यावी लागते. अर्थात अचानक एखादी व्यक्ती आयुष्यातून निघून गेल्यामुळे निराशा होते, रितेपणा वाटतो पण सोयीस्कर रित्या जोडलेल्या नात्यांना सोयीस्कर रित्या आपण विसरूनही जातो. अगदी पार विसरून नाही गेलो तरी त्या नात्याशिवाय जगणे तरी नक्कीच शिकतो. शेवटी सगळेच मिथ्या आहे,. एखाद्या शिवाय आपण जगूच शकत नाही असं खोटा विश्वास आयुष्यभर आपण समोरच्याला देत राहतो आणि आपल्या शिवाय समोरची व्यक्ती जगूच शकणार नाही ह्या खोट्या भ्रमात आपण उर्वरित आयुष्य काढतो. थोडक्यात सगळाच खोटेपणा. ह्या खोटेपणाला धरून आपण आयुष्याबरोबर धावत राहतो. आयुष्य मात्र आहे तिथेच आहे.. आपण मात्र अजूनही वेग पकडायची धडपड करतोय .........
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)