मंगळवार, ५ ऑक्टोबर, २०१०

Ayushya

आयुष्य हे कधीच कुणासाठी थांबत नसते. ते सतत आपल्या गतीने धावत असते. आपण मात्र जन्मभर हा वेग साधायचा प्रयत्न करत राहतो. ज्या क्षणी आपल्याला वाटते कि आपल्या नसण्याने एखाद्या व्यक्तीचे आयुष्य थांबेल.. त्याच क्षणी आपले आणि आयुष्यामाध्ले अंतर वाढायला लागते. एखाद्याचे आपल्या आयुष्यात असणे किंवा नसणे हे पण आपल्या मान्यतेवर अवलंबून आहे. सगळाच आपल्या सवयीचा भाग. एखाद्याच्या असण्याची जशी सवय होते तशीच नसण्याची पण करून घ्यावी लागते. अर्थात अचानक एखादी व्यक्ती आयुष्यातून निघून गेल्यामुळे निराशा होते, रितेपणा वाटतो पण सोयीस्कर रित्या जोडलेल्या नात्यांना सोयीस्कर रित्या आपण विसरूनही जातो. अगदी पार विसरून नाही गेलो तरी त्या नात्याशिवाय जगणे तरी नक्कीच शिकतो. शेवटी सगळेच मिथ्या आहे,. एखाद्या शिवाय आपण जगूच शकत नाही असं खोटा विश्वास आयुष्यभर आपण समोरच्याला देत राहतो आणि आपल्या शिवाय समोरची व्यक्ती जगूच शकणार नाही ह्या खोट्या भ्रमात आपण उर्वरित आयुष्य काढतो. थोडक्यात सगळाच खोटेपणा. ह्या खोटेपणाला धरून आपण आयुष्याबरोबर धावत राहतो. आयुष्य मात्र आहे तिथेच आहे.. आपण मात्र अजूनही वेग पकडायची धडपड करतोय .........

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा